मुंबई महापालिकेत युतीचा ‘दादा’ कोण?
एकत्र गटस्थापनेचा निर्णय फडणवीस-शिंदे घेतील!
शीतल म्हात्रे यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता महापालिकेत सत्तेची समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप व शिवसेनेची युती असून, दोन्ही पक्षांचा एकत्रित गट स्थापन करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, अशी महत्त्वाची माहिती शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या नवनिर्वाचित २९ नगरसेवकांनी आज ‘बाळासाहेब भवन’ येथे अभिवादन केले. या वेळी म्हात्रे यांनी पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत परतल्यानंतरच पक्षाच्या पुढील पावलांबाबत शिक्कामोर्तब होईल. युती म्हणून लढल्यामुळे एकत्रित गट स्थापनेवरच दोन्ही नेत्यांचा भर असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या वेळी म्हात्रे यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर टीका केली. एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, हे गणेश नाईकांना सहन होत नाही. शिंदेंवर पुन्हा टीका केली तर शिवसेना महिला आघाडी त्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवेल, असा इशारा म्हात्रे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

