लाऊडस्पीकर कोसळल्याने
विक्रोळीत बालिकेचा मृत्यू

लाऊडस्पीकर कोसळल्याने विक्रोळीत बालिकेचा मृत्यू

Published on

लाऊडस्पीकर कोसळल्याने
विक्रोळीत बालिकेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना विक्रोळीत लाऊडस्पीकर कोसळून एका चारवर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. डोक्यावरून गोठोडे वाहून नेणाऱ्याचा धक्का लागल्याने स्टँडवर ठेवलेला लाऊडस्पीकर तिच्या अंगावर कोसळला. दरम्यान, याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालिकेचे नाव जान्हवी सोनकर असे असून, ती कुटुंबासोबत भारत माता मंदिर परिसरात राहत होती. तिचे वडील राजेश यांचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या परिसरात सोमवारी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त आयोजकांनी रस्त्यावर लाऊडस्पीकर उभारला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सय्यद अली हा डोक्यावर चिंध्यांचे गाठोडे घेऊन जात होता. त्याचा धक्का लागल्याने स्टँडवर ठेवलेला लाऊडस्पीकर खाली पडला आणि नेमक्या त्याच सुमारास तेथून जाणाऱ्या जान्हवीच्या अंगावर पडला. स्पीकरखाली चिरडून गंभीर जखमी झालेल्या जान्हवीला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात नेले; मात्र तिला मृत घोषित केले गेले. याप्रकरणी पोलिसांनी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने लाऊडस्पीकर उभारणाऱ्या विनोद परमारसह चिंध्यांचे गाठोडे वाहून नेणाऱ्या सय्यद अलीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com