कारवाईआड पोलिसांची आरोपीच्या घरी चोरी
कारवाईआड पोलिसांची आरोपीच्या घरी चोरी
बांगलादेशी महिलेचा आरोप; चार पोलिसांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः कारवाईच्या निमित्ताने घरात शिरलेल्या पोलिसांनी सुमारे २० लाखांची रोकड आणि १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप बांगलादेशी महिलेने केला होता. या आरोपात तथ्य आढळल्याने चेंबूरच्या आरसीएफ पोलिस पथकासह एका खासगी व्यक्तीला २५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे याच पोलिस पथकावर अन्य एका बांगलादेशी महिलेकडून अटक न करण्यासाठी पाच लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरसीएफ पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्षात नियुक्त सहायक निरीक्षक विजय सुतार, अंमलदार योगेश खांडके, नेमाणे, महिला शिपाई मोरे अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार महिला नवी मुंबईत वास्तव्यास असून, तुर्भे येथील बारमध्ये बारबाला म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार २ जानेवारी रोजी आरसीएफ पोलिस पथक घरी धडकले. चौकशीदरम्यान तिने स्वतःहून बांगलादेशी नागरिक असून, भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याची कबुली दिली. पथकाने तपासाच्या निमित्ताने तिला काही तासांसाठी घराबाहेर उभ्या पोलिस वाहनात बसवले. तेवढ्या वेळात घरातील २० लाखांची रोकड आणि १५ तोळ्यांचे दागिने चोरले. चोरीची कुणकुण लागताच महिलेने विचारणा सुरू केली. पोलिस पथकाने सुरुवातीला हे आरोप फेटाळले; मात्र तक्रारदार महिलेने चौकशी सुरूच ठेवल्याने आरोपी पथक भांबावले. त्यांनी तुर्भे येथील बारच्या मालकास संपर्क साधून त्याच्याकडे काही रक्कम आणि काही दागिने सोपवण्यात आले; मात्र तरीही २० लाखांची रोकड आणि अन्य दागिने मिळवण्यासाठी या महिलेने समाजसेविकेच्या मदतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्या आधारे केलेल्या विभागीय चौकशीत महिलेच्या आरोपात तथ्य आढळल्याने या पथकाविरोधात २५ जानेवारी रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. लगोलग अटकही करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

