पोलिस संरक्षण खर्च 
उचलावाच लागेल

पोलिस संरक्षण खर्च उचलावाच लागेल

Published on

पोलिस संरक्षण खर्च
उचलावाच लागेल

अबू सालेमच्या पॅरोलबाबत न्यायालयाचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या धार्मिक विधींसाठी आझमगढ या मूळ गावी जाण्यासाठी तत्काळ पॅरोलसाठी सालेमला प्रवासाचा, पोलिस संरक्षणाचा खर्च उचलावा लागेल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २८) स्पष्ट केले आणि कुख्यात गुंड अबू सालेमला यासंदर्भात सोमवारी (ता. २) भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून, त्याला १४ दिवसांचा पॅरोल मंजूर केल्यास तो पळून जाण्याची भीती राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सालेमला आधी दोन दिवसांचा पॅरोल मंजूर करण्याची तयारी दर्शवली. तथापि बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने आझमगढ येथे जाण्यासाठी लागणारे प्रवासाचे तास लक्षात घेता सालेमला दोनऐवजी चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यास सहमती दिली. सरकारने व्यक्त केलेली भीती लक्षात घेऊन सालेमला पोलिस संरक्षणाशिवाय आझमगढ येथे पाठवता येणार नाही. त्यामुळे सालेमला पोलिस संरक्षणाचा खर्च उचलावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले.

सालेमचा भाऊ अबू हकीम अन्सारीचा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्यू झाला. त्याच्या धार्मिक विधी पार पाडण्यासाठी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी सालेमने १४ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मंजूर करण्याची मागणीसाठी वकील फरहाना शाह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
----
न्यायालयाचे म्हणणे...
सालेम दोन दशकांपासून तुरुंगात असल्याने त्याला पोलिस संरक्षणाशिवाय पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर सालेमवरील गुन्हे लक्षात घेता त्याला अन्य आरोपींप्रमाणे वागणूक दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि सालेम पोलिस संरक्षणाचा खर्च उचलण्यास तयार असेल, तरच त्याला पॅरोल मिळू शकतो, असे न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com