अनेक विमानतळांवर 
‘नाइट लॅँडिंग’ नाही

अनेक विमानतळांवर ‘नाइट लॅँडिंग’ नाही

Published on

अनेक विमानतळांवर
‘नाइट लॅँडिंग’ नाही

मुंबई, ता. २८ : बारामती विमानतळाजवळ बुधवारी (ता. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी विमान अपघातग्रस्त झाले. या अपघाताबाबत कमी दृश्यमानतेची चर्चा सुरू आहे; मात्र बारामती विमानतळासह अनेक ठिकाणी रात्रीची लँडिंग सुविधा नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८.४८च्या सुमारास लँडिंगच्या वेळी घटनास्थळी दृश्यमानता कमी होती. लँडिंगपूर्वी एटीसीने वैमानिकाला धावपट्टी दिसत आहे का, असे विचारले. त्यावर त्याने ती दिसत नसल्याचे सांगितले. एकदा चक्कर मारल्यानंतर विमान पुन्हा आले. तेव्‍हाही वैमानिकाला विचारणा झाली. त्यावर वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची पुष्टी केली. एटीसीने लँडिंगला परवानगी दिल्यानंतर अपघात झाल्याचे दिसून आले, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू म्हणाले.

बारामतीसह जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या विमानतळांवर आणि बारामती, धुळे, कराड ही केवळ फ्लाइंग स्कूलसाठी वापरली जाणारी विमानतळे आहेत. येथे नाइट लँडिंगची सुविधा नाही. या कमतरतेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एखादा व्हीआयपी असो वा सामान्य नागरिक, रात्रीच्या वेळी विमान पर्यायी विमानतळापर्यंत पोहोचण्यापूर्वी इंधन संपण्याचा धोका कायम असतो. यामुळे उशिरा विमान रद्द होणे किंवा थांबणे यांसारख्या समस्या भेडसावतात. विशेषतः मुंबई-नागपूर मार्गावर बारामती आणि धुळे ही मध्यवर्ती ठिकाणे असली तरी नाइट ऑपरेशन्सची कमतरता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. अपघाताचा धोका वाढवणाऱ्या प्रमुख कारणांमध्ये कमी दृश्यमानता, अपुरी प्रकाशयाेजना आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची कमतरता आहे. विमानतळांवर रात्री लँडिंग सुविधा नसल्याने वैमानिकांना अनावश्यक जोखीम घ्यावी लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com