जुन्या चलनी नाण्यांची विक्री महागात
जुन्या चलनी नाण्यांची विक्री महागात
मुंबई, ता. ३० : कोणतीही खातरजमा न करता आजीने साठवलेली जुनी नाणी ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न खासगी कंपनीत व्यवस्थापक महिलेला चांगलाच महागात पडला. दुर्मिळ झालेली चलनी नाणी विकून पैसे कमविण्याऐवजी याच महिलेची सुमारे १० लाखांची फसवणूक झाली. या महिलेने सायबर हेल्पलाइनवर तक्रार दिली असता, त्याआधारे गेल्या आठवड्यात विक्रोळी पोलिसांनी एका संकेतस्थळासह दोन भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवला.
तक्रारदार महिलेकडे तिच्या आजीने साठवून ठेवलेली एक, दोन, पाच पैसे अशी चलनी नाणी होती. ही नाणी चलनातून बाद झाल्याने सध्या ती दुर्मिळ मानली जातात. तक्रारदार महिलेने ही नाणी विकण्याचे ठरवले आणि ती कोण विकत घेऊ शकते, याचा शोध गुगलद्वारे सुरू केला. तेव्हा तिला कॉइन बाजार नावाचे संकेतस्थळ सापडले. तेथे संपर्क साधल्यावर दिलीप कुमार पटेल व हर्ष कुमार नावाच्या व्यक्तींनी महिलेशी संवाद साधला. त्यांनी नाण्यांचे फोटो पाहून या महिलेस या नाण्यांच्या बदल्यात ३८ लाख १४ हजार २१० रुपये देऊ, असे कळवले; मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी या भामट्यांनी विविध कर, खरेदी खताचा खर्च अशा निमित्ताने सुमारे १० लाख उकळले. या भामट्यांनी ३ जानेवारीला संपर्क साधून आणखी ३.८५ लाख रुपये मागितले. तेव्हा महिलेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने आपल्या भावास आणि त्याच्या वकील मित्रास याबाबत सांगितले. या दोघांनी फसवणूक झाल्याचे सांगताच महिलेने तक्रार दिली, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

