लोकलमधील भांडणातून तिघे रुळावर पडले
लोकलमधील भांडणातून तिघे रुळावर पडले
सायन स्थानकातील घटना; एक गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर झटापटीत होऊन तीन तरुण थेट रेल्वे रुळावर कोसळले. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी घडली. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण कुर्ला रेल्वे स्थानकावरून सकाळी सुमारे ९.४० वाजताच्या सुमारास कल्याण-सीएसएमटी धीम्या लोकलमध्ये चढले होते. लोकलमध्ये प्रवासादरम्यान त्यांच्यात वाद झाला. हा वाद पुढे झटापटीत रूपांतरित झाला. त्याच वेळी सायन रेल्वे स्थानकादरम्यान हे तिघेही रुळावर पडले. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा सुमारे नऊ मिनिटांसाठी बंद केला. त्यामुळे त्या मार्गावरील लोकल वाहतूक थांबविण्यात आली. जीवितहानी होऊ नये आणि तत्काळ वैद्यकीय मदत देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जखमी तरुणांना त्वरित सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अफझल चौधरी (वय ३६, रा. गोवंडी, मुंबई) यांची प्रकृती गंभीर असून, सचिन विश्वकर्मा (वय २१, रा. नालासोपारा, ठाणे) आणि जैनिल सय्यद (वय २५, रा. कुर्ला, मुंबई) यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सकाळी सुमारे १०.४३ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी अद्याप कोणाचाही जबाब नोंदविण्यात आलेला नसून, नेमक्या कारणांचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
...
प्रवाशांचे हाल
सायन रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या घटनेनंतर ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा सुमारे नऊ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा तात्पुरती खोळंबली. सकाळी गर्दीच्या वेळी लोकल थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. काही वेळ लोकल डब्यांमध्येच प्रवाशांना थांबावे लागले, तर स्थानकांवरही गर्दी वाढली. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आणि जखमींना तातडीने मदत देता यावी, या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

