वांद्र्यात पाळीव श्वानांचा 
व्‍यावसायिकावर हल्ला

वांद्र्यात पाळीव श्वानांचा व्‍यावसायिकावर हल्ला

Published on

वांद्र्यात पाळीव श्वानांचा
व्‍यावसायिकावर हल्ला

डॉग पार्कमधील घटना; कामगारावर गुन्हा

मुंबई, ता. ३१ : वांद्रे येथील कार्टर रोड डॉग पार्कमध्ये एक रोटविलर आणि दोन जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानांनी व्यावसायिकासह त्याच्या श्वानावर हल्ला केला. या वेळी व्यावसायिकासोबत त्याची दोन वर्षांची मुलगीही होती. या हल्ल्यात व्यावसायिकासाेबत असलेला श्वान जखमी झाला आहे. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या श्वानांची जबाबदारी असलेल्या कामगाराविराेधात खार पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्‍यावसायिक चेज शेट्टी (वय ४०) हे हिल रोड परिसरात राहतात. २८ जानेवारीला सकाळी ते आपली दोन वर्षांची मुलगी आणि पाळीव श्वानासोबत डॉग पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले हाेते. तेथे त्यांच्या श्वानाला पाहून तेथील अन्य तीन पाळीव श्वान आक्रमक झाले. त्यांनी शेट्टी आणि त्यांच्या श्वानावर हल्ला केला. या श्वानांपासून वाचवण्यासाठी मुलीला उंचावर धरले. १० मिनिटांनंतर या श्वानांची जबाबदारी असलेली व्यक्ती तेथे आली आणि शेट्टी यांची सुटका झाली. या हल्ल्यात त्यांचा श्वान गंभीर जखमी झाला आहे.
तपासात हल्लेखोर श्वान हे युनियन पार्क परिसरातील वसुंधरा बंगलोत राहणाऱ्या निखार राठी यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी या श्वानांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीने (डॉग वॉकर) श्वानांना बाहेर फेरफटक्यासाठी नेताना पट्टा बांधणे, तोंड झाकणे आदी खबरदारीचे उपाय करणे अपेक्षित होते. त्याने तसे न केल्याने शेट्टी यांच्यावर हा प्रसंग ओढवला, हे निष्पन्न होताच पोलिसांनी या डॉग वॉकरविरोधात भारतीय दंड संहितेतील २९१ कलमानुसार गुन्हा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com