देशातील पहिले  पशु कल्‍याण निधी मंडळ सुरू

देशातील पहिले  पशु कल्‍याण निधी मंडळ सुरू

Published on

देशातील पहिले  पशू कल्‍याण निधी मंडळ सुरू

इंडिया अ‍ॅनिमल वेल्‍फेअर फोरमचा पुढाकार; १४ कोटींचे पाठबळ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : भारतातील सीएसआर निधीपैकी फक्‍त १.५ टक्‍के निधी पशू कल्‍याणासाठी वापरला जातो. हा निधी पुरेसा नसल्याने   इंडिया अ‍ॅनिमल वेल्‍फेअर फोरम (आयएडब्‍ल्‍यूएफ)ने पुढाकार घेत शनिवारी देशातील पहिले सहयोगात्‍मक अ‍ॅनिमल वेल्‍फेअर फंडिंग सर्कल (पशू कल्‍याण निधी मंडळ) सुरू  केले. या सर्कलला उपाध्‍याय फाउंडेशन, इंडिया अ‍ॅनिमल फंड, केअरिंग फ्रेण्‍ड्स, मेला फाउंडेशन आणि कोएफिशिएण्‍ट गिव्हिंग यांच्‍याकडून १४ कोटी रुपयांचे पाठबळ मिळाले.

पशू कल्‍याण निधी मंडळ सहयोगी व्यासपीठ म्हणून कार्य करेल. त्या माध्यमातून  सामाजिक  व्‍यक्‍ती आणि संस्थांकडून मिळणारा निधी विकासात्‍मक, पुराव्यावर आधारित पशू कल्याण उपक्रमांसाठी वापरला जाईल. तसेच विविध क्षेत्रांतील आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींमध्‍ये दीर्घकालीन परिणाम, जबाबदारी आणि पद्धतशीर परिवर्तन घडवून आणण्‍यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

 उपाध्‍याय फाउंडेशनच्‍या सहसंस्‍थापिका वृंदा उपाध्‍याय म्‍हणाल्‍या, ‘‘पशू मानवी जीवनामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असतानादेखील त्‍यांच्‍या गरजा व अधिकारांकडे दुर्लक्ष करण्‍यात आले आहे तसेच त्‍यांना भेडसावणाऱ्या समस्‍यांकडेदेखील मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. या फोरममध्‍ये आम्‍ही सर्व क्षेत्रांमध्‍ये पशूंच्‍या कल्‍याणाची खात्री घेण्‍यासाठी समन्‍वयित परिसंस्‍था प्रदान करण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच आमचा या कार्याप्रति अथक मेहनत घेणाऱ्या समूहांना परोपकारी साह्य मिळवून देत धोरणात्‍मक निधीमधील तफावत दूर करण्‍याचा मनसुबा होता.’’

-----
सर्प संवर्धन संघटनेची स्‍थापना
या फोरममध्‍ये पश्चिम घाटातील अद्वितीय सर्प संवर्धन संघटनेची स्‍थापनादेखील करण्‍यात आली. यामध्ये निधी देणारे, संशोधक, सर्पशास्त्रज्ञ, संवर्धन तज्ज्ञ, विषतज्ज्ञ आणि सामाजिक  संस्था सर्प संवर्धनाला चालना देण्‍यासाठी एकत्र आले आहेत.  सर्प संवर्धन हा पशू कल्‍याण व संवर्धन परिसंस्‍थेतील अनेकदा दुर्लक्ष झालेला व कमी निधी मिळणारा विभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com