कांदळवनावर पालिका कंत्राटदाराचा भराव
कांदळवनावर पालिका कंत्राटदाराचा भराव
मुंबई : वर्सोवा खाडीतील संरक्षित कांदळवनावर भराव टाकणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा कंत्राटदार पालिकेचा असून कांदळवनांच्या जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारत होता. याप्रकरणी महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आपले सरकार पोर्टलवर राखीव वन म्हणून जाहीर केलेल्या वर्सोवा खाडीत पालिका कंत्राटदाराकडून कांदळवन नष्ट करून भराव, बांधकाम केले जात आहे, अशी तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या पाहणीदरम्यान मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या डीआरएन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे आढळले. तसेच कांदळवनावर भराव केल्याचे आढळले. संबंधित कंत्राटदाराने वन विभागासह अन्य विभागांच्या परवानग्या न घेताच कांदळवनाचा ऱ्हास केल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

