‘हिरकणी’च्या मार्गात एनओसीचा अडथळा
‘हिरकणी’च्या मार्गात एनओसीचा अडथळा
मुंबईत आस्थापनांकडून परवानगी मिळेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिलांना आणि महिला कर्मचाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी सहजपणे आपल्या बाळाला स्तनपान करता यावे म्हणून म्हाडाकडून उपनगरात ५० हिरकणी कक्ष उभारले जाणार आहेत. त्यापैकी ३५ कक्ष उभारण्याकरिता जागा देण्याबाबत सार्वजनिक संस्था, सरकारी कार्यालये उदासीन असल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही संबंधितांकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करताना महिलांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरांत म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून ५० हिरकणी कक्ष उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, ऑक्टोबर २०२४मध्ये कार्यादेश दिले आहेत. दरम्यान, या हिरकणी कक्षासाठी जागा मिळावी म्हणून म्हाडाकडून सरकारी कार्यालये, रुग्णालये, पोलिस, ठाणे, बस स्थानकाच्या व्यवस्थापनांकडे पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार १५ ठिकाणीची एनओसी मिळाली आहे. त्यापैकी १० कामे पूर्ण करण्यात आली असून, पाच कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित ३५ हिरकणी कक्ष उभारण्याकरिता विविध सार्वजनिक कार्यालये व रुग्णालये, सार्वजनिक उद्याने यांच्याशी संपर्क साधून जागा निश्चित करून ना हरकत प्रमाणपत्राकरिता पाठपुरावा सुरू आहे. गेल्या आठ-दहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्यांच्याकडून एनओसी दिली जात नसल्याने कक्षाच्या उभारणीचा वेग मंदावला असल्याचे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
...
सोयी-सुविधांनी सज्ज
झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सुमारे १२५ चौरस फुटांचा हिरकणी कक्ष उभारला जाणार आहे. त्यामध्ये बेड, तीन खर्च्या, फॅन वाॅश बेसिन, पिण्यासाठी पाणी, सॅनिटरी पॅड उपलब्ध असलेली मशीन उपलब्ध करून दिली जात आहे. या कक्षाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

