मेट्रो-४ मार्गावरील महाकाय गर्डर बसवले
मेट्रो-४ मार्गावरील महाकाय गर्डर बसवले
भांडुप पश्चिमेला एमएमआरडीएकडून ३२५ मेट्रिक टनाचे तीन गर्डर; वाहतूक सुरू असतानाच काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मेट्रो-४ वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावरील महत्त्वपूर्ण टप्पा आज एमएमआरडीएने पूर्ण केला. भांडुप पश्चिम येथे तब्बल ३२५ मीटर वजनाचे तीन महाकाय गर्डर यशस्वीरीत्या बसवले. वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता मध्यरात्री फत्ते केलेल्या या मोहिमेमुळे मेट्रोच्या कामाला आणखी वेग येणार आहे. तसेच भांडुप पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
एमएमआरडीएकडून वडाळा-कासारवडवली ही ३३ किलोमीटरची मेट्रो मार्गिका उभारली जात असून, त्याचा कासारवडवली-गायमुख या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर वडाळा-कासारवडवली या टप्प्याचे कामही वेगात सुरू असून, एमएमआरडीएने रविवारी मध्यरात्री भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स लाँचिंगचे काम पूर्ण केले. उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले. या स्टील स्पॅन्सच्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका चारच्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे.
३५ अभियंते, १०० कामगार
या मोहिमेसाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात होते. तसेच ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. महानगरपालिका, बेस्ट, भांडुप वाहतूक पोलिस आणि अन्य यंत्रणाशी समन्वयातून हे काम पूर्ण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

