कोळीवाड्यातील बांधकामे नियमित करा : वर्षा गायकवाड
कोळीवाड्यातील बांधकामे नियमित करा : वर्षा गायकवाड
मुंबई, ता. २ : ‘खारदांडा, कोळीवाडा हा गावठाण भाग असून, येथील रहिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. येथील मालकी हक्काच्या जमिनीवरील बांधकामांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून बांधकामे नियमित करा,’ अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ‘कोळी समाज हा मुंबईतील मूळ रहिवासी असून, खारदांडा, कोळीवाडा या गावठाण भागातील इमारतींच्या दुरुस्ती व बांधकामांबाबत मुंबई महापालिका अधिनियमातील ठोस व स्पष्ट नियमावली अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यास अडचणी येत असून, मालकी हक्काच्या जमिनीवरील अत्यावश्यक दुरुस्तीची कामेही करता येत नाहीत. या तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेत काही स्थानिक घटकांकडून रहिवाशांवर तक्रारी दाखल करून महापालिका व न्यायालयीन माध्यमातून खंडणीची मागणी केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. खार पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून, संबंधित तक्रारी व पुरावे उपलब्ध आहेत. खंडणी न दिल्यास गरीब व सामान्य रहिवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बेघर केले जात असल्याच्या घटना घडत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, सरकारने याची दखल घेऊन येथील गरीब व गरजू रहिवाशांना खंडणीखोर प्रवृत्तीपासून संरक्षण द्यावे,’ असेही गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

