कोस्टल रोडवर भरधाव कारचा अपघात
कोस्टल रोडवर भरधाव कारचा अपघात
मुंबई, ता. २ ः कोस्टल रोडच्या बोगद्यात शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री एका भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दक्षिण मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कारमधील दोन महिलांसह तीन जण जखमी झाले. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी मर्सिडीज चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणासह कार मालक आणि त्याच्या नातीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथे राहणारे प्रसन्न मोपकर (वय ३६) पत्नी आणि सासूसोबत दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते. कोस्टल रोडच्या बोगद्यात त्यांच्या कारला भरधाव मर्सिडीज कारने मागाहून धडक दिली. या धडकेमुळे मोपकर यांची कार पुढे धावणाऱ्या अन्य कारवर आदळली. या अपघातात मोपकर आणि त्यांची सासू किरकोळ जखमी झाले; मात्र त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त कार दक्षिण मुंबईत राहणाऱ्या वृद्ध व्यावसायिकाच्या नावे नोंद आहे. त्यांची नात गाडी घेऊन घरातून निघाली होती. मध्यरात्री तिने ही कार आपल्या अल्पवयीन मित्राच्या हाती दिली. अल्पवयीन चालकाला वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

