आदित्य ठाकरेंनी घेतली माली कुटुंबीयांची भेट

आदित्य ठाकरेंनी घेतली माली कुटुंबीयांची भेट

Published on

आदित्य ठाकरेंनी घेतली माली कुटुंबीयांची भेट

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३ : बारामती विमान अपघातात मृत्यू पावलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांच्या वरळी येथील निवासस्थानी जाऊन आमदार आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या अत्यंत कठीण प्रसंगात ठाकरे यांनी माली कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते आशीष चेंबूरकरही उपस्थित होते.
​‘‘पिंकीसारख्या एका कर्तबगार तरुणीचा असा अपघाती मृत्यू होणे ही अतिशय क्लेशदायक बाब आहे. वरळीने आपली एक लाडकी कन्या गमावली आहे. आम्ही सर्व जण माली कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,’’ अशी भावना आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. ​पिंकी माली या अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आल्या होत्या. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी विमान क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. या भेटीदरम्यान स्थानिक शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com