प्रयाेगशाळा तंत्रज्ञांच्या
नाेंदणीवरून वाद

प्रयाेगशाळा तंत्रज्ञांच्या नाेंदणीवरून वाद

Published on

प्रयाेगशाळा तंत्रज्ञांच्या नाेंदणीवरून वाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये (एमपीसी) अनिवार्य नोंदणीच्या मुद्द्यावरून रुग्णालय प्रशासन आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांत मतभेद निर्माण झाले आहेत. या वादाची तीव्रता वाढल्यानंतर ‘आपले सरकार’ पोर्टलवरून पॅरामेडिकल कौन्सिलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शताब्दी रुग्णालयात एकूण १८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकी पाच तंत्रज्ञांची महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये अद्याप नोंदणी झालेली नाही.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले, की या पाचही तंत्रज्ञांनी नोंदणीसाठी अर्ज केले असून, दोन हजार रुपये शुल्क भरले आहे. त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे किंवा त्यांनी एमपीसीकडून मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांतून शिक्षण घेतल्यामुळे नोंदणीत अडचणी येत आहेत.

एमपीसीकडे तक्रार आल्यानंतर कौन्सिलने रुग्णालय प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रुग्णालयाने सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञांना पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे आदेश काढले. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले काही स्थायी आणि वरिष्ठ तंत्रज्ञ या निर्णयाला विरोध करीत आहेत. आमच्याकडे दीर्घ अनुभव असूनही केवळ नोंदणीअभावी कामावर गदा येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com