इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Published on

इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
आयआयटी संकुलातील घटना

मुंबई, ता. ४ ः आयआयटी संकुलातील बहुमजली वसतिगृहाच्या गच्चीवरून पडून नमन अग्रवाल या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. नमन अपघाताने इमारतीवरून पडला, त्याने आत्महत्या केली की कोणी त्याला खाली ढकलले, हे स्पष्ट करण्यासाठी पवई पोलिसांनी चौकशी तपास सुरू केला आहे.
नमन बीटेकच्या (सिव्हिल इंजिनिअरिंग) दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम शिकत होता. आयआयटी संकुलातील वसतिगृह क्रमांक ४ या नऊमजली इमारतीच्या गच्चीवरून तो पडला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. नमन वसतिगृह क्रमांक ३ मध्ये वास्तव्य करीत होता. तो मध्यरात्री घटनास्थळी का गेला होता, याबाबत पोलिस त्याच्या मित्रपरिवाराकडे चौकशी करीत आहेत. दीडच्या सुमारास आयआयटीच्या सुरक्षा रक्षकांनी मोठा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने धावले तेव्हा त्यांना नमन रक्ताच्या थारोळ्यात आढळला. गंभीर जखमी झालेल्या नमनला सुरक्षा रक्षकांनी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आणले; मात्र येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे घोषित केले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी पाठविला आहे. तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, या घटनेबाबत त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com