भांडुपमध्ये लिफ्ट 
कोसळून पाच जखमी

भांडुपमध्ये लिफ्ट कोसळून पाच जखमी

Published on

भांडुपमध्ये लिफ्ट
कोसळून पाच जखमी

कंत्राटदाराविरोधात गुन्हा

मुंबई, ता. ४ : भांडुप येथील लेक राेड परिसरात एका इमारतीत लिफ्ट कोसळून लग्नसमारंभासाठी आलेले पाच जण जखमी झाले असून एका महिलेचा समावेश आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बॅँक्वेट हाॅल असून तेथून खाली येत असताना ही घटना घडली. याप्रकरणी भांडुप पाेलिस ठाण्यात कंत्राटदाराविराेधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हॉल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. येथे रविवारी (ता. १) रात्री लग्नसमारंभासाठी माेठ्या प्रमाणावर वऱ्हाडी आले हाेते. अपघातातील जखमी वर्षा गुरखे यांनी दिलेल्या जबाबानुसार, हॉलमधून सात ते आठ जण लिफ्टमधून खाली येत होते. अतिरिक्त भार कमी करण्यासाठी गुरखे यांचे पती बाहेर पडले. त्यानंतर बटण दाबताच लिफ्टमध्ये बिघाड झाल्याचे जाणवले. दरवाजे बंद होताच लिफ्ट थेट बेसमेंटमध्ये जाऊन आदळली. गुरखे यांच्यासह इतर यात जखमी झाले. जखमींवर भांडुपच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी लिफ्टची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात अन्य हॉलचालक, मालकासह अन्य व्यक्ती जबाबदार आढळल्यास त्यांनाही आरोपी केले जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com