‘नमामी गंगे’च्या धर्तीवर
मुंबईतील नद्यांसाठी निधी द्या!

‘नमामी गंगे’च्या धर्तीवर मुंबईतील नद्यांसाठी निधी द्या!

Published on

‘नमामी गंगे’च्या धर्तीवर
मुंबईतील नद्यांसाठी निधी द्या!
खासदार वायकरांची संसदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांमधील वाढते प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी ठरत आहे. या नद्यांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर विशेष योजना आणि भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत केली.
​मुंबईच्या या चार प्रमुख नद्या एकेकाळी शहराची जीवनरेखा आणि नैसर्गिक जलनिचऱ्याचा मुख्य आधार होत्या; मात्र अनियंत्रित नागरीकरणामुळे या नद्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रदूषित पाण्यामुळे वर्सोव्यासारख्या समुद्रकिनाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्यासाठी ४०० ते ६०० कोटींचा खर्च करते; मात्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कमतरतेमुळे सांडपाणी थेट जलस्रोतांत मिसळत असल्याने हा सर्व खर्च निष्फळ ठरत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘विशेष पुनरुज्जीवन पॅकेज’ देऊन आधुनिक एसटीपी प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी वायकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com