मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुन्हा वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा वाहतूक कोंडी
सिमेंट कंटेनर बंद पडल्याने समस्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३२ तासांच्या कोंडीनंतर लोणावळ्याजवळ मधल्या मार्गिकेवर सिमेंट कंटेनर बंद पडल्यामुळे हा मार्ग पुन्हा ठप्प झाला. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्ग पोलिसांनी २० ते २५ मिनिटांमध्ये कंटेनर काढला; परंतु तोपर्यंत लोणावळ्याच्या अलीकडे १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली.
आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने झालेली कोंडी फुटते न फुटते तोच तळेगाव ते मळवलीदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारा एक सिमेंट कंटेनर मधोमध बंद पडला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे विस्कळित झाली. एक्स्प्रेस वेवर सुमारे ११ ते १२ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती इतकी गंभीर होती, की केवळ दोन किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासन्तास वाट पाहावी लागली. अन्न-पाण्याविना लहान मुले व वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाकडून बंद पडलेला सिमेंट कंटेनर बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. कोंडी कमी करण्यासाठी काही हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली. सिमेंट कंटेनर २० मिनिटांनंतर हटवण्यात आला, त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

