थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा
थकबाकीदारांवर
कारवाईचा बडगा
मालमत्ता करवसुलीसाठी पालिका आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदारांविरोधात जप्ती आणि लिलावाच्या कारवाईचा वेग वाढवावा, तसेच व्यावसायिक थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. कर निर्धारण व संकलन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
१ एप्रिल २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई महापालिकेने आतापर्यंत ५,४२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. उर्वरित दोन महिन्यांत १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयीन स्थगिती आदेश असलेली प्रकरणे वगळून इतर सर्व प्रकरणांत जप्तीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
---
केवायसी पूर्ण करा!
मालमत्ता कराचे अचूक मूल्यांकन व्हावे, यासाठी सर्व मालमत्ताधारकांनी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रभाग कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. कर भरण्यासाठी पालिकेने डिजिटल माध्यमांचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

