

संजय गांधी उद्यानातील बस होणार बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरण आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालकांनी दिलेल्या पत्रानुसार, उद्यानाच्या अंतर्गत परिसरात होणारी सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोरिवली स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा यादरम्यान धावणारी ‘बेस्ट’ची वातानुकूलित बस क्र. ए-१८८ शुक्रवार (ता. १३) पासून कायमची बंद होणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील संवेदनशील परिसंस्था आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. आता या मार्गावर सार्वजनिक बसऐवजी उद्यानाच्या अंतर्गत पर्यायी व्यवस्थेचा वापर प्रवाशांना करावा लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.