गतिमंद विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा
गतिमंद विद्यार्थ्याला मारहाण
ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, ता. १२ ः गतिमंद विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी एका शिक्षकाविरोधात टिळकनगर पोलिसांकडून मंगळवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गर्गे असे या शिक्षकाचे नाव असून टिळकनगर येथील सुलभा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथे गर्गे प्रशिक्षक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर परिसरात राहणारा २० वर्षीय प्रशिक्षणार्थी जन्मापासून गतिमंद आहे. पालकांनी वयाच्या पाचव्या वर्षी सुलभा स्कूल फॉर मेंटली रिटायर्डेड चिल्ड्रन्स या शाळेत त्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. वयाच्या १८व्या वर्षापर्यंत या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे सुलभा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर येथे व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते, त्यानुसार, पीडित विद्यार्थी या केंद्रात व्यावसायिक प्रशिक्षण घेत होता.
केंद्रातून ३० जानेवारीला घरी परतल्यावर प्रशिक्षक गर्गे यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार या तरुणाने आपल्या आईकडे केली होती. मारहाणीमुळे तरुणाचा डावा कान दुखू लागला. तसेच शरीर ठणकू लागल्याने, दुखापत झाल्याने, दुसऱ्या दिवशी तरुणाच्या आईने मारहाणीबाबत केंद्राच्या मुख्याध्यापकांकडे तोंडी तक्रार केली. मुख्याध्यापकांनी ही तक्रार गांभीर्याने घेत अंतर्गत चौकशी केली. त्यानंतर पीडित तरुणाच्या आईसोबत केंद्राच्या मुख्याध्यापकांनी पोलिस स्थानकात गर्गे यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गर्गे यांच्याविरोधात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमातील कलम ९२(ब) आणि भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२) नुसार गुन्हा नोंदवला असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

