

कर्करोगाचे उपचार आयुर्वेदातून!
‘समाकलन’मध्ये विचारमंथन; वनस्पतींवर संशोधन सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कर्करोग हा सर्वांत गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी अनेकांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागते; मात्र कर्करोगावर आयुर्वेद औषध वनस्पतींचे उपचारदेखील आशेचा किरण ठरू शकतो, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्ण आणि संशोधक व्यक्त करीत आहेत. याबाबत ‘समाकलन २.० राष्ट्रीय एकात्मिक कर्करोग उपचार परिषदे’त विचारमंथन करण्यात आले.
कर्करोग उपचार क्षेत्रात आयुष आणि आधुनिक वैद्यक पद्धतींच्या एकत्रित वापराला चालना देण्यासाठी ‘समाकलन २.० राष्ट्रीय एकात्मिक कर्करोग उपचार परिषद’ गुरुवारी (१२) ॲक्ट्रेक-टाटा स्मारक केंद्रात आयोजित करण्यात आली होती. कर्करोग उपचारासाठी आयुषअंतर्गत औषध शोध व विकास उत्कृष्टता केंद्राच्या मार्गदर्शनाखाली, सीसीआएएसच्या सहकार्याने आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पाठिंब्याने ही परिषद झाली. यात अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर कर्करोग उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी एकत्रित आले होते. या परिषदेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टाटा मेमोरियल सेंटर आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, गोवा यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण कर्करोग उपचार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. टाटा स्मारक केंद्राचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले, की पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधणाऱ्या एकात्मिक आरोग्यसेवेच्या दिशेने ‘समाकलन’ हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पुराव्यावर आधारित आयुष उपचारांमुळे उपचार सहनशक्ती वाढण्यास, रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास आणि मानक कर्करोग उपचारांना पूरक ठरण्यास मदत होऊ शकते. डॉ. विक्रम गोटा, डॉ. नवीन खत्री आदींनी या विचारमंथनात सहभाग घेतला.
...
२० औषधे सूचीबद्ध
- कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींवर संशोधन करीत असून ज्यासाठी खोपोली येथे एक नवीन संशोधन केंद्र उभारले जात आहे. यासाठी आयुष मंत्रालयाने ३०० कोटींचा निधी दिला आहे.
- जवळपास २०० पारंपरिक औषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे. यापैकी २१ औषधी वनस्पतींची लागवड पहिल्या टप्प्यात होईल. तसेच २० वनस्पती औषधांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत चाचण्या सुरू आहेत.
- या संशोधनातून निष्पन्न होणाऱ्या औषधी वनस्पतींचा क्लिनिकल ट्रायल जनावरांवर होईल. त्याच्या निष्कर्षांवरून २०० कर्करोग रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेतले जातील.
- हळद, अश्वगंधा, बाबची, गुडुची, रेस्पिराॅटरल, गिलाॅय, कॅनाबिन्स या औषधी वनस्पतींवर संशोधन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.