हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद १६ दिवसांत ६.४० लाख प्रवास; तिकीट विक्रीतून २.३८ कोटींची कमाई

हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद १६ दिवसांत ६.४० लाख प्रवास; तिकीट विक्रीतून २.३८ कोटींची कमाई
Published on

एसी लोकलला उत्स्फूर्त प्रतिसाद
हार्बर मार्गावरील १६ दिवसांत ६.४० लाख प्रवासी; तिकीट विक्रीतून २.३८ कोटींची कमाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : हार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित लोकल सेवांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या १६ दिवसांच्या कालावधीत तब्बल सहा लाख ४० हजार प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. दररोज सरासरी ४० हजार १७ प्रवासी या सेवांचा लाभ घेत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

या कालावधीत एसी लोकल तिकिटविक्रीतून दोन कोटी ३८ लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. दररोज सरासरी १४.९० लाख रुपयांची कमाई नोंदविण्यात आली. यामध्ये मासिक तिकिटांमधून एक कोटी ७९ लाख, तर प्रवास तिकिटांमधून ५९ लाख रुपयांचा समावेश आहे. पारंपरिक नॉन-एसी प्रथम व द्वितीय श्रेणी प्रवासातून प्रवासी अधिक आरामदायी एसी सेवेकडे वळत असल्याचे चित्र या प्रतिसादातून स्पष्ट होत आहे. सध्या मध्य रेल्वेकडून एकूण ९४ एसी लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. त्यापैकी १४ फेऱ्या २६ जानेवारीपासून हार्बर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.


तिकीट तपासणी मोहीम तीव्र

एसी लोकलमधील विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मुंबई विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये ८१० अनियमित प्रवास प्रकरणे आढळली असून, २.५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये (१० फेब्रुवारीपर्यंत) मुख्य व हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये मिळून १.०१ लाख विनातिकीट/अपूर्ण तिकीट प्रवास प्रकरणे नोंदवून ३.२२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

- रेल्वेचे प्रवाशाना आवाहन

प्रवाशांनी वैध तिकीट खरेदी करून सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. एसी लोकल सेवा ही सुरक्षित, आरामदायी व कार्यक्षम प्रवासासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचेही रेल्वे प्रशासनाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com