वसई रोड स्थानकात नवा पदचारी पूल व उन्नत डेक प्रवासी सेवेत दाखल!
वसई रोड स्थानकात नवा पदचारी पूल, उन्नत डेक सेवेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वसई रोड स्थानकातील प्रवासी वहनक्षमता वाढविण्यासाठी उभारण्यात आलेला नवा पदचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) आणि उन्नत डेक गुरुवारपासून प्रवासी सेवेत दाखल झाला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तर्फे ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ए’ (एमयूटीपी-३ए) अंतर्गत सुरू असलेल्या स्थानक सुधारणा कामांतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
वसई रोड स्थानकातील पूर्वेकडील सर्क्युलेटिंग एरिया ते आयलंड प्लॅटफॉर्म क्रमांक ४-५ आणि ६-७ यांना जोडणारा सहा मीटर रुंद व ४२ मीटर लांबीचा पदचारी पूल पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. पुलासोबतच पूर्व बाजूस जिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे पूर्वेकडून प्लॅटफॉर्मवर पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच नव्या पुलाला जोडणाऱ्या प्रस्तावित २५० मीटर लांबीच्या उन्नत डेकपैकी ५० मीटर लांबीचा आणि १० मीटर रुंद भाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यापूर्वी या डेकमधील ६० मीटरचा भाग डिसेंबर २०२५मध्ये सुरू करण्यात आला होता. उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.
- - - - -
गर्दी कमी होणार
दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असलेल्या वसई रोड स्थानकात नवा पादचारी पूल व उन्नत डेकमुळे प्रवाशांची ये-जा अधिक जलद होण्यास मदत होणार असून, प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. स्थानकातील उभी व आडवी वहनव्यवस्था सक्षम होण्याबरोबरच सुरक्षिततेतही भर पडणार आहे. गर्दीच्या उपनगरी मार्गिकेवर रेल्वे वाहतूक अबाधित ठेवत ही कामे करण्यात आली असून, उर्वरित सुविधा निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे नियोजन एमआरव्हीसीकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

