धावत्या लोकलमधील वृद्धेचा जीव वाचवला

धावत्या लोकलमधील 
वृद्धेचा जीव वाचवला
Published on

‘मांडवी’, ‘तेजस’च्या
विलंबामुळे प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : उपनगरी सेवेनंतर लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरचे नियंत्रणही सुटत चालल्याचे दिसत आहे. दोन दिवस मांडवी आणि तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावल्याने प्रवाशांना स्थानकांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. वेळेवर माहिती न मिळाल्याने प्रवाशांचा रोष अधिकच वाढला. बुधवारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सहा तास, तर गुरुवारी मांडवी एक्स्प्रेस पावणेतीन तास विलंबाने धावली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस नियोजित वेळेत फलाटावर न लागल्याने सुरुवातीपासूनच विलंब झाला. सकाळी सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात सुमारे पावणेतीन तास उशिराने रवाना झाली. मार्गात मशीद स्थानकाजवळ आपत्कालीन साखळी ओढल्याने काही वेळ गाडी थांबली आणि विलंबात भर पडली. परिणामी, दादरसह पुढील स्थानकांवरील वेळापत्रक पूर्णपणे ढासळले.

दादर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी गाडीची वाट पाहत थांबले होते; मात्र गाडी सुटण्याच्या वेळेबाबत स्पष्ट उद्‍घाेषणा होत नसल्याची तक्रार करण्यात आली. फलाटावर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. या प्रकाराबाबत प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे.
प्रीमियम सेवेत गणल्या जाणाऱ्या मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचाही प्रवास विस्कळित झाला. नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा तास उशिराने ही गाडी सुटली. वेळ बदलल्याची घोषणा करूनही प्रत्यक्ष प्रस्थान आणखी लांबले. रात्री पोहोचणारी गाडी पुढील दिवशी सकाळी दाखल झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले. शयनयान सुविधा नसल्याने रात्रभर बसून प्रवास करावा लागल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. दादर ते सीएसएमटीदरम्यानचा प्रवास रद्द केल्याने प्रवाशांना सामानासह लोकलने पुढे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com