बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध ‘ॲक्शन प्लॅन’

बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध ‘ॲक्शन प्लॅन’
Published on

बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध ‘ॲक्शन प्लॅन’
महापौरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणांवर अवैध ठाण मांडून बसलेल्या बांगलादेशी व रोहिंग्या फेरीवाल्यांविरोधात नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन कारवाईबाबत सविस्तर चर्चा केली. महापौरांच्या या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

​महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारताच अवैध घुसखोरांना हटविण्याची घोषणा केली होती. या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी त्यांनी शुक्रवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता महापालिका मुख्यालयात पोलिस आणि पालिकेच्या परवाना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. मुंबईत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या आधार कार्डची आणि इतर ओळखपत्रांची सत्यता पडताळण्याबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

​काही वर्षांत मुंबईत फेरीवाल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यात अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘हा केवळ अतिक्रमणाचा मुद्दा नसून शहराच्या आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तसेच यामुळे स्थानिक मुंबईकरांच्या रोजगारावर आणि हक्कांवर गदा येत आहे,’ असे मत महापौरांनी व्यक्त केले.
​---
महिला सुरक्षेला प्राधान्य!

​फुटपाथवर गर्दी वाढल्यामुळे महिलांना चालताना आणि खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी गैरवर्तनाच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि मुंबईचे पदपथ अतिक्रमणमुक्त व्हावेत, याला आपली प्राथमिकता असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com