नॅशनल पार्कातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी हालचाली

नॅशनल पार्कातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी हालचाली
Published on

नॅशनल पार्कातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी हालचाली
पात्रतेसाठी कागदपत्रे सादर करण्याची आणखी एक संधी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता वेग आला असून, १६,४७८ अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवली जात असून, या यादीतील रहिवाशांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.
​उच्च न्यायालयाच्या १९९७च्या आदेशानुसार, उद्यानातील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरू आहे. या प्रक्रियेचे सनियंत्रण उच्चाधिकार समितीमार्फत केले जात आहे. ‘ग्रँट थॉर्नटन भारत एलएलपी’ या अधिकृत एजन्सीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून १६,४७८ अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी वन विभागाच्या संकेतस्थळावर तसेच बोरिवली येथील उपसंचालक कार्यालय व स्थानिक वन परिक्षेत्र कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम पात्रता निश्चित करण्यासाठी रहिवाशांना १ जानेवारी १९९५च्या मतदान यादीत नाव असल्याचा पुरावा, पुनर्वसनासाठी पूर्वी भरलेल्या ७,००० रुपयांच्या पावतीची प्रत, वन विभागाने दिलेला झोपडी क्रमांक, १९९५ ते २०११ दरम्यानच्या मतदान यादीत नाव असल्याचा पुरावा आणि आधार कार्ड, रेशन कार्ड ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

विविध भागांत पुनर्वसन कक्ष कार्यान्वित
रहिवाशांच्या सोयीसाठी चिंचपाडा, दामूनगर, क्रांतीनगर, मालाड (पठाणवाडी) आणि मुलुंड (खिंडीपाडा) अशा विविध भागांत पुनर्वसन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये सकाळी ७:३० ते रात्री ९:३० या वेळेत कागदपत्रे स्वीकारली जातील.​ ज्यांचे नाव प्राथमिक यादीत आहे किंवा जे प्रत्यक्ष वन क्षेत्रात वास्तव्यास आहेत, अशा सर्व अतिक्रमणधारकांनी ही अंतिम संधी मानून विहित मुदतीत कागदपत्रे जमा करावीत. निर्धारित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा पुराव्यांचा फेरविचार केला जाणार नाही, असे आवाहन उपसंचालक (दक्षिण) किरण पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com