वाकोला नदीत कचरा टाकणाऱ्यांना बसणार चाप
वाकोला नदीत कचरा टाकणाऱ्यांना बसणार चाप
दीड कोटींचे उभारणार संरक्षण कुंपण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वाकोला नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीपात्रात कचरा व शिळे अन्न टाकण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. एच पूर्व विभागातील ज्ञानेश्वरनगरलगतच्या झोपडपट्टी परिसरात वाकोला नदीकाठी संरक्षक कुंपण उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासाठी एक कोटी ५१ लाख ६९ हजार रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाकोला नदीकाठच्या झोपडपट्टी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि टाकाऊ वस्तू थेट पात्रात फेकल्या जातात. यामुळे केवळ नदीचे पाणीच प्रदूषित होत नाही, तर नदीच्या नैसर्गिक प्रवाहातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा नदीकाठच्या वस्त्यांमधून शिळे अन्न, प्लॅस्टिक आणि घरगुती कचरा थेट वाकोला नदीच्या पात्रात टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषित होऊन पावसाळ्यात जलवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उपमुख्य अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कार्यालयामार्फत हे संरक्षक कुंपण उभारण्यात येणार आहे.
या कामासाठी महापालिकेने एक लाख ५२ हजार रुपये इसारा रक्कम निश्चित केली असून, १४ फेब्रुवारीपासून निविदा विक्रीला सुरुवात झाली आहे. इच्छुक कंत्राटदारांना २३ फेब्रुवारी २०२६ला दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन निविदा सादर करता येणार आहेत. त्यानंतर २ मार्चला आर्थिक पाकीट उघडण्यात येईल. या प्रकल्पासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले असून, यामुळे वाकोला नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नागरिकांना नदीपात्रात कचरा फेकणे कठीण होणार असून, वाकोला नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
तरंगणारा प्लॅस्टिक कचरा आणि साचलेला गाळ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणाऱ्या जलवाहिन्या तुंबतात. परिणामी परिसरात पाणी साचून पूरसदृश स्थिती निर्माण होते. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

