मुंबईत कोकणवासीयांसाठी ‘कोकण भवन’ची मागणी
मुंबईत ‘कोकण भवन’ची मागणी
- मंत्री नितेश राणे यांचे महापौर रितू तावडे यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईत वास्तव्यास असलेल्या तसेच विविध कारणांनी मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी हक्काचे ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.
मुंबईच्या जडणघडणीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठे योगदान आहे, असे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे अतूट नाते असून, शहरातील मोठा वर्ग मूळचा कोकणातील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उच्च साक्षरता, शिक्षण व रोजगाराच्या संधी तसेच वैद्यकीय सुविधांमुळे कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणावर मुंबईत येतात. मात्र त्यांच्यासाठी हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वतंत्र सांस्कृतिक कला केंद्राची मागणी
कोकणातील कला, साहित्य, इतिहास आणि सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक कला केंद्र उभारण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षण व वैद्यकीय कारणांसाठी येणाऱ्या कोकणवासीयांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्याची मागणी राणे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

