किल्ले सुवर्णदुर्गवर ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ मोहिमेचा श्रीगणेशा

किल्ले सुवर्णदुर्गवर ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ मोहिमेचा श्रीगणेशा

Published on

किल्ले सुवर्णदुर्गवर ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ मोहिमेचा श्रीगणेशा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन उपक्रमाचा प्रारंभ
मुंबई, ता. १८ (सकाळ वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पुढाकाराने राज्यातील ऐतिहासिक ११ किल्ल्यांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम’ राबविण्यात येणार आहे. “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” या संकल्पनेवर आधारित या मोहिमेचा शुभारंभ शिवजयंतीच्या औचित्याने (ता. १९) किल्ले सुवर्णदुर्ग येथे होणार आहे.
जय शिवराय प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने आयोजित सुवर्णदुर्ग येथील शिवजयंती उत्सवात सकाळी ९.१५ वाजता या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेत समाविष्ट गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासोबतच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा संदेश दिला जाणार आहे.
दरम्यान, या दौऱ्यादरम्यान मंडळाचे अध्यक्ष व सदस्य सचिव इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांतही सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी ‘हवामान बदल आणि कृषी क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर संवाद साधला जाणार आहे. तसेच दुपारी २.३० वाजता लोटे परशुराम औद्योगिक वसाहत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी हॉटेल ‘फर्न’ येथे प्रदूषण नियंत्रण व औद्योगिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com