पालिका रुग्णालयांतील खासगी कँटीनच्या ठेकेदारीवर विधानसभेत प्रश्न,
पालिका रुग्णालयांतील खासगी कँटीनच्या ठेकेदारीवर विधानसभेत प्रश्न
शासनाकडून माहिती सादर करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी कंत्राटदारांमार्फत चालवल्या जाणाऱ्या कँटीन व्यवस्थेबाबत अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित कँटीन ठेकेदारी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा तसेच नियमबाह्य निर्णय झाल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने नगरविकास विभागाच्या उपसचिवांना तातडीचे पत्र पाठवून सविस्तर माहिती मागवली आहे.
दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयातील थाळी पद्धतीला कामगारांनी विरोध करण्याची घटना याला निमित्त ठरली असून आता पालिका रुग्णालयात खासगी कँटीनच्या ठेकेदारीवर प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. कस्तुरबा रुग्णालयाच्या किचनचे खासगीकरण करून थाळी पद्धत सुरू करणे, कंत्राटदाराकडून २७ पदे मंजूर करणे, या भरतीला आणि थाळी पद्धतीला कामगारांनी विरोध करणे, यावर प्रशासनाने काय कारवाई केली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.
यावर प्रश्न मंजूर झाल्यावर दोन दिवसांच्या आत संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, माहिती वेळेत न आल्यास प्रश्न स्वीकृत केला जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांनी असा आरोप केला आहे, की रुग्णालयातील रुग्ण व नातेवाइकांना परवडणारे, दर्जेदार व स्वच्छ अन्न मिळावे, या उद्देशाने निर्णय घेतल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, अशी व्यवस्था राबवली जात आहे. याप्रकरणी शासनाकडून लवकरच सविस्तर उत्तर सादर होणार असून, परिघीय रुग्णालयांतील कँटीन व्यवस्थेवर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
या प्रश्नांची शक्यता :
* महापालिकेच्या अखत्यारितील परिघीय रुग्णालयांमध्ये कँटीनसाठी ठेकेदारी पद्धत लागू करण्याचा निर्णय केव्हा आणि कोणत्या कारणासाठी घेण्यात आला?
* कँटीन चालविण्यासाठी किती कंत्राटे देण्यात आली असून त्यासाठी कोणती निविदा प्रक्रिया राबविण्यात आली?
* संबंधित निर्णयाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अथवा संघटनांनी विरोध केला होता का?
* असल्यास त्यावर काय कार्यवाही करण्यात आली?
* कँटीन ठेकेदारी प्रक्रियेत विलंब का झाला आणि त्यास जबाबदार कोण?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

