रेल्वे लाईनलगत झोपडीधारकांचे पुनर्वसन ठरल्याशिवाय निष्कासन नको

रेल्वे लाईनलगत झोपडीधारकांचे पुनर्वसन ठरल्याशिवाय निष्कासन नको

Published on

रेल्वे लाइनलगतच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन ठरल्याशिवाय निष्कासन नको
खासदार वर्षा गायकवाड यांचे रेल्वे प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : रेल्वे लाइनलगत राहणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन धोरण निश्चित झाल्याशिवाय कोणतीही निष्कासन कारवाई करू नये, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविले आहे.
बर्मा शेल रेल्वे लाइनलगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाच्या विद्यमान धोरणानुसार पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे आणि पात्रतेची छाननी पूर्ण होईपर्यंत निष्कासन कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
२०१९ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच २०२२ मध्ये रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली; मात्र अद्याप पात्रतेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट २०२३ पासून सातत्याने निष्कासनाच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने स्थानिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वे अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलावून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, असेही खासदार गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com