एलआयसी म्युच्युअल फंडाचा विशेष टेक्नॉलॉजी फंड
एलआयसी म्युच्युअल फंडाचा विशेष टेक्नॉलॉजी फंड
मुंबई, ता. १९ : एलआयसी म्युच्युअल फंडाने आज विशेष टेक्नॉलॉजी फंड बाजारात आणण्याची घोषणा केली असून यात आयटी सेवा, डेटा सेंटर, डिजिटल प्लॅटफॉर्म, आयटी सेवा अशा विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाईल.
एलआयसी म्युच्युअल फंडाचे एमडी व सीईओ आर. के. झा यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. आयटी फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. आता आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यामुळे दोन ते तीन वर्षांतच चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल आणि अनेक वर्षे याची चढती कमान राहील, असेही ते म्हणाले. या फंडातील ८० टक्के रक्कम शेअर व शेअरशी संबंधित साधनांमध्ये गुंतवली जाईल. इतर रक्कम आयटीखेरीज अन्य कंपन्यांचे शेअर तसेच कर्जरोखे व चलन बाजारात तसेच इन्व्हिटमध्ये गुंतवली जाईल. ‘टेक्नॉलॉजी क्षेत्रात सातत्यपूर्ण वाढ दाखवण्याची क्षमता असलेल्या, भरपूर रोख प्रवाह असलेल्या आणि वाढत्या कामकाजाच्या कंपन्यांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाईल,’ असे मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले.
...
विविध पर्याय
एनएफओ कालावधीत या फंडात किमान १,००० रुपये आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. रोज एसआयपी करायची असल्यास शंभर रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत रक्कम भरता येईल. दरमहा एसआयपी करायची असल्यास किमान दोनशे रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. किमान त्रैमासिक एसआयपी १,००० रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

