पालिकेच्या वसाहतींचा होणार पुर्नविकास

पालिकेच्या वसाहतींचा होणार पुर्नविकास

Published on

पालिकेच्या वसाहतींचा पुनर्विकास होणार
अडीच हजार सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : चिंचपोकळी आर्थर रोड साने गुरुजी मार्ग येथे पालिकेच्या वसाहती आहेत. त्या वसाहतींचा पुनर्विकास मुंबई महापालिका करणार आहे. या वसाहतीत सफाई कामगारांची २५० घरे होती. आता या वसाहतींचा पुनर्विकास करत २,५०० घरे बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
पालिकेतील विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांची भेट घेत निवेदन दिले. या वसाहतीत २२५ सेवासदनिकांसह चार धार्मिक स्थळे होती. बुद्ध विहार, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर असून, वसाहतींचा पुनर्विकास करताना २२५ सफाई कामगारांच्या घराचे निष्कासन करून त्यांना पुनर्विकास झाल्यानंतर याच जागेत घर देण्याचे ठरले आहे. वसाहतीचा पुनर्विकास होईपर्यंत प्रति महिना २० हजार रुपये भाडे द्यावे, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान संबंधित धार्मिक स्थळे तात्पुरत्या स्वरूपात प्लॉटमधील एका भागात स्थलांतरित करण्यात येतील. २,५०० घरे पूर्ण झाल्यानंतर नव्या इमारतींच्या तळमजल्यावर या धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी जागा देण्यात येईल. लक्ष्मीनारायण मंदिराचे स्थलांतर ८ ते १० दिवसांत करण्यात येणार असून, मंदिर तोडण्याऐवजी ते हलवून नव्या ठिकाणी उभारण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
-----
पुनर्विकास वेगाने करा
वसाहतींच्या पुनर्विकासाला चालना मिळाल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी पालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com