अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी

अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी

Published on

अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सोळावर्षीय अल्पवयीन पीडिता गर्भधारणा सुरू ठेवण्यास इच्छुक नसल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तिच्या आईने दाखल केलेली गर्भपात करण्याची याचिका न्यायालयाने नुकतीच मान्य केली आहे.
अल्पवयीन मुलीची गर्भधारणा सुरू ठेवण्यास असलेली अनिच्छा तसेच बाळंतपण आणि पालकत्वाबाबत तिची अनिश्चितता लक्षात घेऊन न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गर्भपाताला परवानगी दिली. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासंदर्भात दिलेल्या अशाच एका निर्णयाचाही न्यायालयाने दाखला दिला.
संबंधित अल्पवयीन मुलीच्या आईने याचिका दाखल केली होती. १९७१च्या वैद्यकीय गर्भधारणेच्या समाप्ती कायद्यानुसार गर्भधारणेचा कालावधी २४ आठवड्यांपेक्षा जास्त असल्याने न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी याचिकेत केली होती. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने ठाणे सिव्हिल रुग्णालयाला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आणि मुलीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. १३ फेब्रुवारीला वैद्यकीय तपासणीअंती या टप्प्यावर गर्भपात केल्याने तिच्या जीवाला कोणताही धोका नसून आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे वैद्यकीय मंडळाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले. त्या अहवालाची दखल घेऊन खंडपीठाने गर्भपातास परवानगी दिली. त्याच वेळी उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात गर्भपाताला परवानगी देण्याची विनंती फेटाळून लावली. ही शस्त्रक्रिया ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये वैद्यकीय मंडळामध्ये समावेश असलेल्या दोन स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचेही आदेशात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com