ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एम. एम. बेग यांचे निधन
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एम. एम. बेग यांचे निधन
मुंबई, ता. १९ ः ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एम. एम. बेग यांचे अंधेरी पश्चिम येथील निवासस्थानी निधन झाले आहे. स्थानिक पोलिसांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यात आला असता, बेग यांचा मृतदेह आढळला. ते ७० वर्षांचे होते. एम. एम. बेग गेल्या काही काळापासून आजारी होते आणि एकटे राहत होते.
चार-पाच दिवसांपासून ते घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी वांद्रे येथील रुग्णालयात नेण्यात आला. बेग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यांनी जे. ओम प्रकाश, विमल कुमार आणि राकेश रोशन यांच्यासोबत अनेक हिंदी चित्रपटांवर काम केले. स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ‘छोटी बहू’ हा चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरला. तसेच ‘रझिया सुलतान’सारख्या चित्रपटांशीही त्यांचा संबंध होता.
बेग यांची कन्या बेबी गुड्डू (खरे नाव शाहिंदा बेग) या १९८०च्या दशकातील लोकप्रिय बालकलाकार होत्या. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अभिनेता हृतिक रोशनच्या सुरुवातीच्या काळात संवादफेक, आवाजातील चढ-उतार आणि उच्चारांबाबत मार्गदर्शन केल्याचेही सांगितले जाते. एम. एम. बेग यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी आणि शांत स्वभावाचा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला असून, त्यांच्या योगदानाची आठवण चाहत्यांमध्ये कायम राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

