आभासी पतपेढीत ८८ लाखांची गुंतवणूक
आभासी पतपेढीत ८८ लाखांची गुंतवणूक
भाच्याची फसवणूक करणाऱ्या मामाचा शोध सुरू
मुंबई, ता. २० ः अस्तित्वात नसलेल्या पतपेढीत १८ टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवत एका भामट्याने चक्क आपल्याच नातेवाइकाला तब्बल ८४ लाखांचा गंडा घातला. हा धक्कादायक प्रकार दादर येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश गुप्ता (वय ४८) असे भामट्याचे नाव आहे. दादर परिसरात सँडविच विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिनेश गुप्ता या तरुणास परमेशने फसवले. परमेश हा दिनेशचा चुलत मामा आहे. परमेशने जन सहयोग ग्रुप फायनान्स या नावे पतपेढी सुरू केल्याचे दिनेशला सांगितले. या पतपेढीत मुदत ठेव किंवा अन्य योजनांमध्ये पैसे ठेवल्यास १८ टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभनही दाखवले. मामाचीच पतपेढी असल्याने दिनेशने २०१३ पासून २०२५ पर्यंत पत्नीच्या नावे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये दिनेशने वडिलोपार्जित दुकान विकून आलेले ३० लाख रुपयेही त्यात गुंतवले.
दिनेशने केलेल्या एकूण ८८ लाखांच्या गुंतवणुकीवर परमेशने चार लाख रुपये रोख दिले, तर त्याच्या पत्नीच्या नावे ३८ लाखांचा धनादेश दिला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तो बँकेत सादर केला असता वटला नाही. तेव्हा दिनेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर त्याने शोधाशोध केली असता जन सहयोग ग्रुप फायनान्स या नावाची शहरात एकही पतपेढी नसल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्याने दादर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे परमेशविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

