पीसीएम,पीसीबी सीईटीच्या प्रवेश नोंदणीस २४ फेब्रुवारीपर्यंत व एमबीए/एमएमएस सीईटीच्या प्रवेश नोंदणीस २५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ

पीसीएम,पीसीबी सीईटीच्या प्रवेश नोंदणीस २४ फेब्रुवारीपर्यंत व एमबीए/एमएमएस सीईटीच्या प्रवेश नोंदणीस २५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ

Published on

सीईटीच्या प्रवेश नोंदणीस अंतिम मुदतवाढ
दोन्ही संधी मिळून १२ लाख ५१ हजार ७९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
मुंबई, ता. २० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व ॲग्रीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) व एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची अंतिम मुदतवाढ २४ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे व मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/ मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए/एमएमएस) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची अंतिम मुदतवाढ २५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. एमएचटी सीईटी पीसीएम, पीसीबी व एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी १० जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होती. याला पहिली मुदतवाढ दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत देण्यात आली होती.

दोन्ही संधी मिळून १२ लाख ५१ हजार ७९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
यावर्षीपासून प्रथमच एमएचटी पीसीएम, पीसीबी व एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या दोन संधी दिल्या जात आहेत. आजपर्यंत या तिन्ही सीईटीसाठी पहिल्या संधीसाठी आठ लाख ३१ हजार २७७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून, दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाख २० हजार ५१५ आहे. दोन्ही संधी मिळून १२ लाख ५१ हजार ७९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com