सर्वोदय सुपर मार्केटमध्ये एका कोटीचा अपहार

सर्वोदय सुपर मार्केटमध्ये एका कोटीचा अपहार

Published on

सर्वोदय सुपर मार्केटमध्ये एका कोटीचा अपहार
मुंबई ः दादरच्या सर्वोदय सुपर मार्केट या घाऊक बाजारपेठेत एक कोटीचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सुपर मार्केटला धान्य, वस्तू पुरवणाऱ्या कंपन्या, व्यावसायिकांच्या नावे सुमारे एक कोटी रुपये या कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाइकांच्या खात्यांमध्ये फिरवले. मयंक अगरवाल असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो दादर येथील दुकानात अकाउंटंट म्हणून काम करत होता. दुकान मालकाला हिशेबात गडबड आढळल्याने त्याने बँक स्टेटमेंट तपासले. तसेच पुरवठादारांना संपर्क साधला, तेव्हा अगरवालची चोरी समोर आली, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com