अद्ययावत मोनोरेल लवकरच सेवेत येणार

अद्ययावत मोनोरेल लवकरच सेवेत येणार

Published on

अद्ययावत मोनोरेल लवकरच सेवेत येणार
आयएसए सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मोनोरेल पुन्हा एकदा नव्या दमात, नव्या ढंगात सेवेत येणार आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे अडखळणाऱ्या मोनोरेलसाठी नवीन रोलिंग स्टॉक आणि सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणाली उभारली असून, त्याबाबतचे स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता प्रमाणपत्र (आयएसए) मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ब्यूरो व्हेरिटास’ या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडून हे देण्यात आले आहे. त्यामुळे मोनोरेल लवकरच सेवेत दाखल करणे शक्य होणार आहे.

‘मोनोरेल मार्गा उभारलेल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता प्रमाणपत्र मिळणे, हे सुधारित सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता पुढील टप्प्यात संपूर्ण १९.५४ किमी मोनोरेल कॉरिडॉरच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी आणि प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अंतिम वैधानिक मंजुरी मिळावी, याकरिता सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रियादेखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल,’ असे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे.

‘मेड इन इंडिया’ रेक्स
मोनोरेल पूर्ण क्षमतेने सुरू करता यावी, म्हणून २१ आधुनिक सुधारणांसह नवीन रेक मोनोच्या ताफ्यात आणण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी अनुकूल आसन व्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, डायनॅमिक मार्ग नकाशे, अधिक सुरळीत प्रवासासाठी सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा मानकांचे कठोर पालन करणारे डिझाइन, आधुनिक मेट्रो-शैलीतील अंतर्गत सजावट आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग व सर्व्हेलन्स प्रणाली आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com