''महादृष्टी''ला आशियायी बँकेकडून अर्थसहाय्य

''महादृष्टी''ला आशियायी बँकेकडून अर्थसहाय्य

Published on

‘महादृष्टी’ला आशियायी बँकेकडून अर्थसाह्य

मंगलप्रभात लोढा; चार हजार कोटी रुपये मिळणार

मुंबई, ता. २१ : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या छाननी समितीने कौशल्य विभागाच्या महत्त्वकांक्षी महादृष्टी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून सुमारे चार हजार कोटींचे अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे समाजातील दुर्बल घटकांनाही लाभ होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

आशियायी बँकेकडून मिळणाऱ्या अर्थसाह्यामुळे आता ग्रामीण, दुर्गम भागातील कौशल्य प्रशिक्षण अधिक अत्याधुनिक आणि दर्जेदार होईल. यात महिलांसाठीही विशेष तरतूद करण्यात येणार असून यातून महिला सक्षमीकरणही होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेने केलेल्या शिफारशींनुसार राज्याच्या कौशल्य विभागाने औद्योगिक प्रशिक्षण, संस्थांच्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण गुणवत्ता वाढीसंदर्भात मित्राच्या सहकार्याने एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून केंद्राकडे यासंदर्भात अहवाल सादर केला होता. याला केंद्रीय छाननी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता महादृष्टी प्रकल्पाद्वारे उद्योगांच्या मागणीनुसार देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.

एकीकडे दक्ष प्रकल्पाला जागतिक बँकेचे सहकार्य लाभले आहे. तसेच पीएम सेतू योजनेचाही महाराष्ट्राला लाभ होईल. महादृष्टी हा प्रकल्प दोन्ही योजनांशी सुसंगत असून, या प्रकल्पातून उर्वरित राहिलेल्या घटकांना महादृष्टी प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल. त्यामुळे या सर्व प्रकल्पांचा निधी सुनियोजितपणे कौशल्य विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयोगात आणला जाईल.
-----
मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी
राज्यातील कौशल्य विकास विभागाच्या विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आणि उद्योगसंलग्न उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एशियन बँकेच्या सहकार्यामुळे यात आता मोठी भर पडेल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण, इमारतीची पुनर्बांधणी, प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक साहित्य आणि यंत्रणा, उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण उपक्रम तसेच नव्या कौशल्य अभ्यासक्रमांची अंमलबजावणी यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात लक्षणीय वाढ होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com