दादर येथे भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन
भाजप कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन
फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या धमकीचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधी यांना जीवे मारण्याबाबत दिलेल्या धमकीचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसकडून शनिवारी सायंकाळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस आंदोलन करणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलिसांची दडपशाही मोडून काढत झीनत शबरीन यांच्या नेतत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयसमोर पोहोचून तीव्र घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजपच्या कार्यालयासमोर फुले उधळून अनोख्या पद्धतीने निषेध केला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिस स्थानकात नेले.
या वेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या, की आंदोलनादरम्यान आम्ही भाजप कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही, असा स्पष्ट संदेश दिला. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हा लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

