रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर ताण;

रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर ताण;

Published on

रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर ताण; २६ फेब्रुवारीला ‘ठिय्या आंदोलन’चा इशारा
मुंबई, ता. २२ ः सार्वजनिक आरोग्य खात्यातील कनिष्ठ निरीक्षक, संशोधन निरीक्षक, क्षयरोग निरीक्षक तसेच इतर तांत्रिक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पात्र कर्मचाऱ्यांनी आवश्यक अर्हता पूर्ण करूनही पदोन्नतीचे आदेश अद्याप जारी झाले नसल्याची खंत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि बैठका होऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल मजदूर युनियनने गुरुवारी (ता. २६) कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक रजा घेऊन ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.
रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्यात अडथळे येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संसर्गजन्य रोग नियंत्रण, क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले. गुरुवारी होणाऱ्या सामूहिक रजा आणि ठिय्या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com