मेट्रो कारशेडवर उभ्‍या राहणार व्यवसायिक इमारती

मेट्रो कारशेडवर उभ्‍या राहणार व्यवसायिक इमारती

Published on

मेट्रो कारशेडवर उभ्‍या राहणार व्यावसायिक इमारती
एमएमआरडीए प्राधिकरणाचा हिरवा कंदील; व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील जागांचे दर गगनाला भिडलेले असल्याने नव्या इमारती, व्यावसायिक संकुले कुठे उभारायची, नवीन जागा कशा उपलब्ध करायच्या, हा प्रश्न असतानाच एमएमआरडीएचा आता आपल्या मेट्रो डेपोच्या छतावर व्यावसायिक इमारती उभारण्याचा विचार आहे. त्याला एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अशाप्रकारे व्यावसायिक इमारती उभारणे व्यवहार्य आहे का, याची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात एमएमआरडीए तब्बल ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कारशेड उभारावी लागणार असून, त्याला मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. दरम्यान, मेट्रोसह वेगवगेळे प्रकल्प उभारण्यासाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, तो कर्जरूपाने उभारावा लागतो.
केवळ तिकीटविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून या कर्जाची परतफेड शक्य नाही. त्यामुळे मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कारशेडच्या छतावार व्यावसायिका इमारती उभारून किंवा त्याचा व्यावसायिका वापर करून निधी उभारता येईल का, याबाबत एमएमआरडीएची चाचपणी सुरू होती. त्याला प्राधिकरणाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाल्याने एमएमआरडीएकडून आता त्याची व्यवहार्यता तपासली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या कारशेडवर लक्ष
एमएमआरडीएने मेट्रो २अ आणि ७ मार्गिकेसाठी चारकोप येथे कारशेडची उभारणी केली असून, मेट्रो २ बी मार्गिकेच्या मंडाळे येथील कारशेडचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच मोघरपाडा, निळजे, कशेळी आणि कांजूरमार्ग येथे विविथ मेट्रो मार्गिकांसाठी कारशेड उभारले जाणार आहेत. त्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर करता येईल का, याची एमएमआरडीएकडून चाचपणी सुरू आहे.

प्रतिसाद मिळणार का?
मेट्रो कारशेडच्या छताचा व्यावसायिक वापर करण्याची एमएमआरडीएची योजना असली तरी मेट्रोची सर्व कारशेड शहराच्या बाहेरील बाजूला असणार आहेत. त्यामुळे त्याच्या छताचा व्यावसायिका वापर केला तरी त्याला व्यावसायिकांकडून, ग्राहकांकडून प्रतिसाद मिळणार का, हा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे व्यवहार्यता तपासणीत काय समोर येईल, त्या अनुषंगाने एमएमआरडीएकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com