कोळी समाजाचा आझाद मैदानात मोर्चा

कोळी समाजाचा आझाद मैदानात मोर्चा

Published on

कोळी समाजाचा आझाद मैदानात मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांचा वारसा जपत असलेल्या महादेव कोळी, डोंगर कोळी, भोर कोळी व कोळी मल्हार या आदिवासी जमातीवर गेल्या अनेक दशकांपासून अन्याय होत आहे. याविरोधात सोमवारी (ता. २३) आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोळी समाज नेते दत्ताभाऊ सुरवसे यांनी दिली.
कोळी हा अनेक जमातींचा समूह आहे. यात महादेव कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी किंवा टोकरे कोळी व कोळी मल्यार या अनुसूचित जमाती आदिवासी कोळी समूहाचे ग्रुप आहेत. १९५० पूर्वीच्या मानववंशशास्त्रीय पुराव्यानुसार यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. कोळी समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा आंदोलन, मोर्चे काढूनही सरकारने त्यांची दखल घेतली नाही. सोमवारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ सुरवसे यांनी सांगितले. या मोर्चामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणांवरून शेकडोंच्या संख्येने कोळी बांधव मुंबईत येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com