आयआयटीच्या विद्यार्थ्याकडे जिवंत काडतुसे
आयआयटीच्या विद्यार्थ्याकडे जिवंत काडतुसे
पवई येथील वसतिगृहातील प्रकार; बिहारमधून मित्राला अटक
मुंबई, ता. २२ : पवई येथील आयआयटी संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकडे पाच जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याच्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात राहणाऱ्या मित्राला अटक केली आहे. या विद्यार्थ्याकडे पोलिस चौकशी करीत आहेत.
१९ फेब्रुवारीला पहाटे वसतिगृह क्रमांक एकमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांत वाद झाल्याची माहिती मिळताच आयआयटीच्या शीघ्र कृती दलाने तेथे धाव घेतली. पथकाच्या मध्यस्तीमुळे हा वाद काही क्षणात मिटला. दरम्यान, वाद घालणाऱ्या एका विद्यार्थ्यासह त्याचा मित्र वसतिगृहातच दारू प्यायल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने दोघांच्या खोल्यांची झाडाझडती सुरू केली. यात एका विद्यार्थ्याच्या खोलीतून ७.६५ बोअरची पाच जिवंत काडतुसे सापडली. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पथकाने विद्यार्थ्याकडे चौकशी केली तेव्हा ही काडतुसे खोली क्रमांक ११५मध्ये राहणाऱ्या अपूर्व मिश्रा याची असल्याचे कबूल केले. अपूर्वने ही काडतुसे समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा मित्र सर्वोत्तम चौधरी याची आहेत. गेल्या आठवड्यात तो आयआयटी संकुलात आला होता. तेव्हा ती त्याने आपल्याला दाखवली. ती वसतिगृहात राहणाऱ्या मित्रांना दाखवण्यासाठी घेतली, असे सांगितले. यानंतर पथकाने हा प्रकार पवई पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी ही काडतुसे जप्त केली. तसेच अपूर्वकडे चौकशी सुरू केली. त्याच दिवशी पोलिसांनी आयआयटी संकुलात आलेल्या चौधरी याला ताब्यात घेतले. त्याने ही काडतुसे बिहारच्या मुंगेर या अवैध शस्त्रबाजारातून खरेदी केल्याचे चौकशीत कबूल केले. त्याआधारे त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौधरीकडे काडतुसे का विकत घेतली, त्याचा वापर कुठे, कसा होणार होता, आयआयटीत शिकणाऱ्या मित्राकडे ती का ठेवली, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

