धारावीतील बेकायदा औषध साठा जप्त
धारावीत बेकायदा औषधसाठा जप्त
एक लाखांहून अधिक किमतीचे साहित्य ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : धारावी येथील कुंभारवाडा परिसरात विनापरवाना औषध साठवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने नुकतीच धाड टाकून एक लाख तीन हजार पाचशे पन्नास रुपये सत्तेसष्ठ पैसे किंमतीचा औषधसाठा जप्त केला.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ मधील तरतुदींचा भंग झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्तवार्ता शाखेला सायन येथील मे. अपना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या पेढीकडून कुंभारवाडा, धारावी येथे एका खोलीत विनापरवाना सलाइन आणि इतर औषधांची विक्रीसाठी साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती.
संबंधित जागेसाठी परवाना नसल्याबरोबरच परवान्यासाठी अर्जही करण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या बृहन्मुंबई कार्यालयातील औषध निरीक्षक हेमंत अडे आणि अजय माहुले यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तपासादरम्यान औषध निरीक्षक हेमंत अडे यांनी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले, तर उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
विहित तरतुदीनुसार संबंधित व्यक्तींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे आणि सह आयुक्त विजय जाधव यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) वि. आर. रवि, सहाय्यक आयुक्त (बृहन्मुंबई) प्रवीण हरक आणि डी. एम. दरंदळे यांनी कारवाई यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

