विरार ते दहिसरदरम्यान ‘कवच’ची यशस्वी चाचणी
विरार ते दहिसरदरम्यान ‘कवच’ची यशस्वी चाचणी
पुढील टप्पा ‘राम मंदिर’पर्यंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर ‘कवच’ या स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणालीच्या स्थापनेला वेग आला आहे. विरार ते दहिसर यादरम्यान या प्रणालीची यशस्वी ट्रायल पूर्ण झाली असून, आता पुढील टप्प्यात राम मंदिर स्थानकापर्यंत चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. या प्रणालीमुळे लोकल गाड्यांचे परिचालन अधिक सुरक्षित होणार असून, संपूर्ण पश्चिम उपनगरी मार्ग सप्टेंबर २०२६पर्यंत ‘कवच’च्या संरक्षणाखाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेकडून विरार ते चर्चगेट या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या उपनगरी कॉरिडॉरवर ‘कवच’ प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी विरार ते डहाणूदरम्यान ‘कवच’चा यशस्वी ट्रायल घेण्यात आली असून, त्या मार्गावर मेल-एक्स्प्रेस गाड्या या प्रणालीसह चालविण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विरार ते दहिसर यादरम्यान ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता राम मंदिर स्थानकापर्यंत चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. देशातील सर्वाधिक व्यस्त उपनगरी रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या या मार्गावर ‘कवच’ प्रणाली बसविणे हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
...
६७ कोटींचा प्रकल्प
विरार ते चर्चगेट ‘कवच’ प्रकल्पासाठी सुमारे ६७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, सप्टेंबर २०२६पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे. ‘कवच’ प्रणालीमुळे गाड्यांचे परिचालन अधिक सुरक्षित होण्याबरोबरच वेळपालनातही सुधारणा होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
तांत्रिक कामांना वेग
‘कवच’ प्रणालीसाठी आवश्यक असलेले लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्वेक्षण सुरू असून, त्यापैकी सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. ट्रेन्सच्या अचूक ट्रॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगिंगचेही जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
...
ओएफसी टाकण्याचे काम
केबल रूट सर्वेक्षण आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे कामही वेगाने सुरू असून, त्यातील ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या सर्व तांत्रिक कामांमुळे पश्चिम उपनगरी मार्गावरील लोकल सेवा अधिक सुरक्षित आणि सक्षम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

